मेगाब्लॉक च्या नावाखाली पॅसेंजर केल्या रद्द

Foto
औरंगाबाद :- परभणी-मुदखेड दरम्यान मेगाब्लॉक चे काम रेल्वे विभागाने हाती घेतले आहे. मेगाब्लॉक मुदखेडला आणि त्रास औरंगाबादच्या प्रवाशांना कशासाठी? असा प्रश्न रेल्वे प्रवाशी सेनेच्या वतीने उपस्थित करत मेगाब्लॉक च्या नावाखाली दोन पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करून संताप व्यक्त केला.
रेल्वे प्रवाशी सेनेचे तीव्र आंदोलन

रेल्वे प्रवाशी सेनेच्या आज सकाळी रेल्वे स्थानकात मेगाब्लॉक च्या कामामुळे दोन पॅसेंजर रद्द केल्या आहे. त्यामुळे प्रवाशांची होणारी हाल थांबवावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी काचीगुडा -नगरसोल पॅसेंजर(५७५६१) ही रेल्वे परभणी ते नगरसोल दरम्यान उद्यापासून १६ तारखेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. तसेच (५७५६२) नगरसोल-काचीगुडा पॅसेंजर उद्यापासून नगरसोल- परभणीपर्यंत बंद केली आहे. त्यामुळे उद्यापासून सकाळी आणि संध्याकाळी परभणी आणि नगरसोल च्या जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच नंदिग्राम एक्सप्रेस ही आजपासून तीन दिवस रद्द केली आहे. त्यामुळे विद्यार्थीवर्ग आणि चाकरमान्यांची हाल होणार आहे. तसेच दक्षिण भारतातल्या एक्सप्रेस मात्र सुरू ठेवल्या आहेत. असा भेदभाव का केला जात आहे? असा प्रश्न ही यावेळी आंदोलन कर्त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मेगाब्लॉक च्या कामामुळे रेल्वे रद्द केल्या परंतु प्रवाशांना पर्यायी व्यवस्था का केली नाही ? असा प्रश्न उपस्थित करत प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था करावी. तसेच सकाळी आणि संध्याकाळी पाच दिवस डेमो शटल चालवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी रेल्वे प्रवाशी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमणी, अक्षय वायकोस, अरुण भाग्यवंत, आसिफ शेख सय्यद , इर्फान शेख, वैभव रानडे सह रेल्वे सेना महिला आघाडीच्या सदस्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker